Ad will apear here
Next
रॉक्सेट बँडची गायिका...
रॉक्सेट या स्वीडिश बँडच्या माध्यमातून मरी फ्रेड्रिकसन यांनी तरुणाईला शुद्ध रॉक संगीताची भुरळ घातली. अलीकडेच त्यांचे निधन झाले. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय....
.....
मरी फ्रेड्रिकसन यांचा जन्म १९५८साली गोस्टा आणि इनेज या दाम्पत्याच्या पोटी एस्जा या छोट्या स्वीडिश खेड्यात झाला. ती चार वर्षांची असताना, तिचे पालक ऑस्ट्रा झुंगबी येथे गेले. तिथे मरीला बीटल्स, जोनी मिशेल, जिमी हेंड्रिक्स या गायकांच्या गाण्याची गोडी लागली. वयाच्या सतराव्या वर्षी एका संगीत शाळेत तिने प्रवेश घेतला.  तिथे तिने नाट्य विभागातील विद्यार्थ्यांच्या हौशी नाटकांसाठी संगीत दिले. हळूहळू तिने स्वत:च्या स्वरावली आणि शब्दावलींच्या आधारे देशातील विविध संगीत समूहांमध्ये उमेदवारी सुरू केली. 

दरम्यान, पर गेस्ले या स्वीडनमधील गिटारवादकाशी तिची ओळख झाली आणि या दोघांनी १९७८ मध्ये रॉक्सेट या बँडची स्थापना केली. एक तपामध्ये या बँडने द लुक, जॉयराइड, इट मस्ट हॅव बीन लव्ह, लिसन टू युवर हार्ट अशी वेड लावणारी गाणी तयार केली. यातल्या ‘द लुक’ या गाण्याची नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये दुनिया में जिना है तो ...आणि दिल में कुछ होने लगा..अशी दोन गाणी तयार झाली.

पश्चिमेत मायकेल जॅक्सन आणि आपल्याकडे बप्पी लाहिरींच्या डिस्को बीट्सचा धुमाकूळ सुरू असण्याच्या काळात रॉक्सेट या स्वीडिश बँडचे शुद्ध रॉक संगीत उदयाला आले. इलेक्ट्रिक गिटारवरील धून, कोरसचा वापर आणि ध्वनिमुद्रण तंत्रात झालेल्या प्रगतीचा गाणी फुलविण्यासाठी केलेला योग्य वापर यामुळे या बँडने एकापेक्षा एक हीट गाण्यांचा धडाका लावला. मरी फ्रेडरिक्सन यांचे नाव या बँडची गायिका म्हणून युरोप  आणि अमेरिका खंडात गाजू लागले.

२००२ मध्ये मरी फ्रेडरिक्सन यांना मेंदूचा असाध्य आजार जडला; पण खचून न जाता आजारावर मात करण्यासाठी नवे संगीत करण्याचा मार्ग त्यांनी वापरला. आजारपणातही त्यांनी तीन नवे अल्बम तयार करीत शैलीसंपन्न गाणी सादर केली. अशा या गुणी गायिकेचे वयाच्या ६१ व्या वर्षी ९ डिसेंबर २०१९ रोजी निधन झाले.  जगभरातील संगीत-वर्तुळात त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त झाली.

- अरविंद जोशी 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZAUCH
Similar Posts
कोकावाला… दिसायला काळासावळा, ठिगळाची विजार, दंडकी पैरणं, डोक्याला पटकूर आणि हातात कोका घेऊन येणारा तो कोकावाला मला नेहमीच आठवायचा. त्याचा मुलगा शामा याला मी आश्रमशाळेत घातलं. पुढं त्याचं काय झालं...हे कळलंच नव्हतं...आज अचानक...
धारणा बदलताहेत.. यंदाच्या एक, दोन नाही तर पाच प्रमुख सौंदर्य स्पर्धांचं विजेतेपद कृष्णवर्णीय सौंदर्यवतींनी पटकावलं. फक्त गौर वर्ण म्हणजे सौंदर्य नाही; सौंदर्याची व्याख्या खूप वेगळ्या पद्धतीने करता येते, हे या तरुणींनी दाखवून दिलं. त्यामुळे समाजातील जुनाट धारणा आजची स्त्री बदलून टाकेल, असा विश्वास निर्माण होत आहे....
दक्षिण कोकणची रंगभूमी - दशावतारी नाट्य पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन! त्या निमित्ताने, दक्षिण कोकणातील वैभवशाली दशावतारी नाटक परंपरेवर प्रकाश टाकणारा हा लेख!
सुबोध भावे बनला प्रस्तुतकर्ता मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमांत वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारा अभिनेता सुबोध भावे दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही परिचित आहे. आता तो प्रस्तुतकर्ता म्हणून पुढे येत आहे. आटपाडी नाइट्स या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language